कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला प्रति टन 300 रुपये ऍडव्हान्स मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कागल तालुक्यातीलतीन साखर कारखानदारांकडे केली आहे. हा हप्ता तातडीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावा.
हप्ता न जमा झाल्यास कारखान्यातून बाहेर पडणारे इतर उत्पादक पदार्थ रोखण्यात येतील असा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला आहे.
कागल तालुक्यातीलसर सेनापती संताजी घोरपडे सहकारी साखर कारखाना,लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना, अन्नपूर्णा जगरी वर्क्स या कारखान्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
गेल्या वर्षी तुटलेल्या उसामुळे साखरेला आणि उपपदार्थ नाही चांगला भाव मिळालेला आहे. चालू वर्षी ऊस तोडणीमजूर , औषधांचे दर, खते यांचे दर वाढलेले आहेत. याचा विचार करून हा दुसरा हप्ता बिना अट हातावर जमा झाला पाहिजे.
निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील ,शहराध्यक्ष संदीप चौगुले ,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस नितेश तालुका पक्ष अध्यक्ष तानाजी मगदूम ,तालुका अध्यक्ष नामदेवराव भराडे,प्रभू भोजे ,संभाजीराव यादव, पांडुरंग चौगुले, सुधीर पाटील, पांडुरंग अडसूळ, प्रमोद,मगदूम दीपक खेडे,पांडुरंग चौगुले, बाबुराव सुतार, सागर चौगुले, वसंत पाटील, जयसिंग सावेकर, राजेंद्र झांजगी, सिताराम पाटील , शिवाजी कळमकर,अविनाश मगदूम, राणोजी गोधडे,व इतर शेतकरी यांच्या सह्या आहेत.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते.
-------------------------------

