ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय शाखा मुरगुड यांचे मार्फत रक्तदान महाअभियान कार्यक्रम.

Kolhapur news
By -

 

           





                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 


 राज योगिनी दादी प्रकाश मणी यांच्या 19 व्या पुण्यतिथी निमित्त ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय मुरगुड यांचेमार्फत lरक्तदान अभियान कार्यक्रम राबवण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन नगर परिषदेचे पाणीपुरवठा विभागाचे सभापती सत्यजित सिंह पाटील यांनी केले.

 

     रक्त दान केल्याने जीवनदानाचे पुण्य मिळते आणि जीवन दान हे सर्व श्रेष्ठ दान मानले जाते. यातून विश्व बंधुत्वाचाही संदेश  विदयालयमार्फत दिला जातो असे संचालिका लता बहेनजी यांनी यावेळी सांगितले.


     रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पत्रकार राजेंद्र चव्हाण यांनी स्वतः व त्यांच्या कुटुंबातील सहाजणांनी रक्तदान केले.एकूण सत्तर हुन अधिक युवकांनी रक्तदान केले.


   प्रमुख उपस्थितांमध्ये  नगरसेवक अनिल राऊत, राजेंद्र आमते, विजय मेंडके, सम्राट मसवेकर (सर्व नगरसेवक ) मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव होडगे, प्राचार्य जि. के भोसले इत्यादींचा समावेश होता. कोल्हापूर येथील अर्पण ब्लड बँकेचे रवि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

  प्रास्ताविक बिके लक्ष्मी बहेनजी यांनी केले. आभार संभाजी पाटील यांनी मानले. विद्यालयाचे भाई भिकाजी भांदिगरे, रामचंद्र पाटील, विलास करडे, संजय मगदूम, राजू कांबळे, अनिल आंगज,अनुराधा लोहार,सृष्टी आंगज, श्रद्धा वर्णे, आनंदा हळदकर यांचे योगदान मोठे होते.

 रक्त दात्यांना विद्यालयामार्फत भेट वस्तू देण्यात आल्या.


      



      -------------------------------