सोनगे ता. कागल येथील चौंडेश्वरी देवीची यात्रा अत्यंत उत्साहात. सार्वजनिक सभागृहाचे नागपंचमी दिवशी उद्घाटन.

Kolhapur news
By -

 

            


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


      सोनगे ता. कागल येथील चौंडेश्वरी देवीची यात्रा नागपंचमीच्या दिवशी अत्यंत उत्साहात पार पडली.चौंडेश्वरी देवीचे स्थान जागरूक देवस्थान मानले जाते. महाराष्ट्रासह कर्नाटकातून हजारो भाविक आज देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येत असतात.


अगदी पहाटे पासून भक्तांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. नाग साप म्हंटले की लगेच त्याला मारायला काठ्या घेऊन लोक सरसावत असत. पण अलीकडे  ती वृत्ती बदलली आहे. साप शेतातील उदरांपासून पिकांचे रक्षण करतो. एका अर्थाने तो शेतकऱ्याचा मित्र मानला जातो. 



  नागपंचमी दिवशी नागाची पूजा केली जाते. जिवसृष्टी आणि निसर्ग यांचेशी मानवाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. त्यामुळेच सोनगे  येथील चौंडेश्वरी देवीच्या नागपंचमी यात्रेला एक आगळे महत्व आहे.


    या गावात सार्वजनिक कार्यक्रमासाठी एक खुले सभागृह बांधण्यात आले आहे. या सभागृहाचे उद्घाटन   पश्चिम महाराष्ट्र शिवसेना युवा नेते वीरेंद्रसिंह मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले.आजच्या दिवशी  त्याचे लोकार्पणही करण्यात आले.


    




   

         --------------------------------