मोफत वाचनालयाचा मुरगुड बस स्थानकावर प्रारंभ

Kolhapur news
By -

 

              



                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने मुरगूड तालुका कागल येथील बस स्थानकावर मोफत वाचनालय सुरू करण्यात आले. लाल आखाडा संकुल व्यायाम मंडळाचे वस्ताद पै. पांडुरंग पुजारी यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. 



 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगूड चे प्राचार्य एस पी पाटील होते. 



 प्रास्ताविकात बाबुराव परीट यांनी एस टी महामंडळाचे अध्यक्ष परिवहन मंत्री नाम. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून अशी वाचनालय सुरू करण्यात आल्याचे सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यातील तीन बस स्थानकावर ही वाचनालये सुरू झाली असून यामध्ये मुरगूड बस स्थानकाचा समावेश आहे. विद्यार्थी प्रवासी वर्ग,वाचकांनी त्याचा लाभ घेऊन परिवहन महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन केले. 


    यावेळी जेष्ठ पत्रकार व्ही.आर भोसले यांनी एसटी महामंडळाने बस स्थानकावर सुरू केलेल्या मोफत वाचनालय उपक्रमाचे कौतुक केले. बस सेवा उपलब्ध होईतोपर्यंत रिकाम्या वेळी इतरत्र फिरण्यापेक्षा येथे ठेवण्यात आलेली पुस्तके व वर्तमानपत्र यांचे वाचन करावे व आपल्या ज्ञानात भर घालावी असे सांगितले.



     कार्यक्रमाचे स्वागत राजू चव्हाण यांनी केले. यावेळी पांडुरंग पाटील,नामदेव एकल, वाहतूक नियंत्रक  बि.डी परीट, सुनील चव्हाण,संजय भोसले,अमृत पाटील, व चालक वाहक कर्मचारी मुरगूड विद्यालय शिवराज विद्यालय येथील ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





           -------------------------------