कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सहाय्यक शिक्षण संचालक डॉ. गणपती कमळकर लिखित 'विश्वश्रेष्ठ शिक्षण देणारे देश आणि भारत' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या पुस्तकात जागतिक स्तरावरील शिक्षणपद्धती, विविध देशांमधील शैक्षणिक वैशिष्टये आणि भारतीय शिक्षणव्यवस्थेच्या संदर्भातील महत्वपूर्ण विषयांचा वेध घेण्यात आला आहे. जागतिक शिक्षणव्यवस्थेचा अभ्यास करून भारतातील शिक्षणाच्या वाटचालीविषयी विचारमंथन करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाचे महत्व अधोरेखित होत आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. रजनीश कामत, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनीलकुमार लवटे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख उपस्थितांमध्ये सकाळ प्रकाशनच्या कार्यकारी संपादक दीपाली चौधरी, कौन्सिल ऑफ एज्युकेशन, कोल्हापूरचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम आणि कोल्हापूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांचा समावेश आहे.
हा कार्यक्रम पुष्पा देशपांडे रशिवडेकर सभागृह, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, आझाद चौक, कोल्हापूर येथे होणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, शिक्षक, साहित्यप्रेमी आणि वाचकांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे. असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
--------------------------

