कोल्हापूर न्यूज नेटवर्क
"पाऊले चालती पंढरीची वाट,सुखी संसाराची सोडुनिया गाठ" या
संतवचनातील भावार्थ जपत मुरगूड येथील संत कबीर दिंडी दर वर्षी प्रमाणे याही वर्षी काढण्यात आली आहे. या दिंडीने भक्तिमय वातावरणात नुकतेच पंढरपूरकडे मंगल प्रस्थान केले.
ही दिंडी संत कबीर दिंडी म्हणून प्रसिद्ध असून कागल तालुक्यातील मुरगूड येथे दरवर्षी संपन्न होणारा हा भक्ती उत्सव आहे.
दिवाळीत भाऊबीजे दिवशी कार्तिक आषाढीला दिंडीची सुरुवात होते.मुरगूड ते पंढरपूर जाणारी ही पायी दिंडी वाघापूर येथील असलेले ह.भ प. राम तोरशे साहेब यांनी सुरुवात केली. दिंडी ला भोजन पाणी,औषधे इत्यादी खर्चासाठी दानशूर व्यक्तीं मदत करत असतात.
कै. दिलीपसिंह विश्वनाथराव पाटील कै.अजितसिंह वि. पाटील यांनी सुरुवातीला उदार हस्ते अर्थिक मदत केली.
टाळ मृदूंगच्या गजरात भक्तीमय वातावरणात ही दिंडी सलग दहा दिवस पायी वाटचाल करते. जागोजागी दिंडीचे विठ्ठल भक्तांकडून जोरदार स्वागत होते.
दिंडी साठी कॅबिनेट मंत्री हसनसो मुश्रीफ, रणजितसिंह पाटील व प्रविणसिंह पाटील यांनीही अर्थिक मदत केली आहे. मुरगूड शहरात दिंडी परत आल्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. त्याला म्हामदे असे म्हणतात. दिंडी सोबत डॉक्टर,आचारी,व भक्तांची सेवा करण्यासाठी स्वयंसेवक तैनात असतात.
या दिंडी साठी योगदान देणाऱ्या वारकरी भक्तांची नावे या प्रमाणे. मारुती शेट्टी, पांडुरंग भांदीगरे, लखन वर्पे,बाळू शेळके,अशोक भोसले राजाराम चव्हाण (माऊली लाडु)बापु रावळ,श्रीकांत गायकवाड,राजू गोधडे, स्वप्निल साळुंखे,विठ्ठल भुते,गुड्डू भुते बाळासाहेब हासबे, भुते बंधु आणि मुरगुड मधील सर्व तरुण मंडळे.
------------------------

