सगळा निकाल हातात पडेपर्यंत, सर्टिफिकेट हाती पडेपर्यंत तू मतमोजणी केंद्र सोडू नकोस

Kolhapur news
By -

             

      


           मुंबई : "गोकुळची मतमोजणी ज्या दिवशी चालू होती , त्या दिवशी  मतमोजणी पूर्ण  होण्यास विलंब लागत होता . त्यावेळी  पवार साहेबांचा चार किंवा पाच वाजता फोन आलेला. मी मोटरसायकलवरुन मतमोजणी केंद्रावर गेलो.कदाचित त्यांना कोणी सांगितलं असेल किंवा बघितलं असेल, त्यांचा फोन आला. पवारसाहेब मला म्हणाले काय चाललंय, मी सांगितलं साहेब जरा गोंधळ चालला आहे. पवारसाहेबांनी मला एकच सूचना केली. मतमोजणी होऊन, सगळा निकाल हातात पडेपर्यंत, सर्टिफिकेट हाती पडेपर्यंत तू मतमोजणी केंद्र सोडू नको". मी म्हटलं नाही साहेब मी सगळं झाल्यावरच बाहेर पडेल, असं सतेज पाटील यांनी एका वृत्त वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना सांगितलं.  


 
सतेज पाटील म्हणाले की, मी अजिबात गाफील नव्हतो, मी पूर्णपणे तयार होतो. राजकारणात एवढी वर्ष आहे, गाफिल राहिलो असतो तर ती अपरिपक्वता ठरली  असती. विरोधकांना समजून घेणं, त्यातल्या त्यात 15 वर्ष मित्र होते ते काय करु शकतात हे समजून घेतलं नसेल तर मी राजकारणात कच्चा असेल हे म्हणाव लागलं असतं, असं सतेज पाटील म्हणाले. 


           ---------------------------