कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गोकुळ दूध संघातील शासन नियुक्त संचालकांच्या निर्णयाविरोधात मुरगूड येथे शासनाची निषेध फेरी काढण्यात आली.
मुरगूड तालुका कागल येथील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने गोकुळ दूध संघातील शासन नियुक्त संचालकांच्या निर्णयाविरोधात मुरगूड येथील शिवतीर्थ चौक येथे शासनाचा निषेध करून
'या शासनाचे करायचं काय खाली डोकं वर पाय '
अशा घोषणा देण्यात आल्या .
धनगर समाजाचे युवा नेते अप्पाजी मेटकर आपल्या भाषणामध्ये म्हणाले की आम्हीं महायुती सरकारचा तीव्र शब्दात निषेध करतो.तसेच सोमवारी दि. ९ रोजी महायुतीच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरातील दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री मेंटकर यांनी केले.यावेळी तानाजी डोंगरे यांनी तीव्र शब्दात महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी दत्तात्रय जाधव, बाजीराव जाधव,आप्पाजी मेंटकर,सुनील जाधव तानाजी डोंगरे डॉ.आशोक खंडागळे बजरंग सोनुले रामचंद्र भुते, सुरेश गोधडे,संभाजी मांगले,तुषार साळुंखे, सुनील कापसे, अनिल शिंदे, अशोक मसवेकर, चंद्रकांत कुंभार, पंकज नेसरीकर, शिवाजी पाटील, विशाल इंदलकर, संभाजी मांगले, विजय आढाव,आदी शेतकरी व दूध उत्पादक बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
------------------------



