पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेबाबत संस्थाचालकांना मार्गदर्शन

Kolhapur news
By -

 

       


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क



पवित्र पोर्टल अंतर्गत २०२५ मधील शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीसह पदभरतीबाबत जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन बैठकीत संस्थाचालक व मुख्याध्यापकांना भरती प्रक्रियेच्या पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.



शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुवर्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी उपस्थित संस्थांचे प्रतिनिधी, संस्थाध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापक यांना पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेची माहिती दिली. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीच्या अनुषंगाने संस्थास्तरावर करावयाची कार्यवाही, मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या नियम व मार्गदर्शक सूचनांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तज्ञ मार्गदर्शक राहुल मसणे यांनी  शिक्षक भरती प्रक्रियेतील पुढील टप्पे नियमानुसार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत संस्थांच्या प्रतिनिधींना माहिती दिली . पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येणारी शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. 



यावेळी विस्तार अधिकारी डी. ए. पाटील यांच्यासह पोर्टल साठी पात्र असणारे  संस्थाचालक प्रतिनिधी, मुख्याध्यापक उपस्थित होते. 


पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेबाबत संस्थाचालकांना मार्गदर्शन प्रसंगी संस्थाचालक प्रतिनिधी व मुख्याध्यापक उपस्थित होते.


    ------------------