कोल्हापूर न्यूज नेटवर्क
दि. २ व ३ नोव्हेंबर रोजी श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या सन २०२६-२७ मधील आंतरविभागीय पुरुष व महिला तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 19 कॉलेजमधून 56 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी माजी सरपंच, माणगाव व नवमहाराष्ट्र सूतगिरणी, साजणीचे अध्यक्ष मा. डॉ. राजू मगदूम, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक मा. डॉ. शरद भोसले, डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एस. के. खाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रतिमापूजनाने व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा देऊन स्पर्धेची सुरुवात झाली. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्पर्धांमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे असून हरणे व जिंकणे हा गौण भाग आहे. स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या अंगी खिलाडू वृत्ती, नेतृत्व, आत्मविश्वास, परस्पर सहकार्य, धैर्य असे विविध गुण वृद्धिंगत होतात, असे सांगून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांनी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य आवश्यक असून शारीरिक व मानसिक स्वास्थ्याबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी ती महत्वपूर्ण असल्याचे सांगितले व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
महिला गटातून ईपी तलवारबाजीमध्ये प्रथम वैभवी माने, द्वितीय दिव्यांका कदम, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा, तृतीय अपूर्व कळके महावीर कॉलेज, कोल्हापूर व चतुर्थ मीनल मकानदार शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स डी. एस. कदम सायन्स कॉलेज, गडहिंग्लज यशस्वी झाले. फॉईल तलवारबाजीमध्ये वालचंद कॉलेज, सांगली येथील तनवी कुरडे प्रथम, गडहिंग्लज कॉलेज येथील संजना कांबळे द्वितीय, जयसिंगपूर कॉलेजमधील सोनाली कांबळे तृतीय व गडहिंग्लज कॉलेजमधील रंजना कांबळे चतुर्थ क्रमांकाने यशस्वी झाल्या. तर सॅबर तलवारबाजीमध्ये विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील श्लोका शिंदे प्रथम व सायली माने द्वितीय गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली येथील श्रेया कुंभार तृतीय व भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, कोल्हापूर येथील भूमिका पाटील हिने चतुर्थ क्रमांक पटकावत यश संपादन केले.
पुरुष गटातून ईपी तलवारबाजी स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मंथन कांबळे प्रथम किसनवीर महाविद्यालय, वाई येथील प्रणव चव्हाण द्वितीय वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सांगलीमधील संतोष ओलेकर तृतीय व डी. के. ए. एस. सी. कॉलेज, इचलकरंजी येथील श्रीवर्धन फटाळे याने चतुर्थ क्रमांक पटकावला. फॉईल तलवारबाजीमध्ये गडहिंग्लज कॉलेजमधील अथर्व कर्नाळे प्रथम, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील रितेश पोवार द्वितीय तर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील भूषण पाटील तृतीय व आदित्य पाटील यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला तर सॅबर तलवारबाजी स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील आदित्य अंगल प्रथम; शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील शिरीष अंगल द्वितीय; विवेकानंद कॉलेजमधील श्रीशैल शिंदे तृतीय तर गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली येथील श्रीनिवास पाटील याने चतुर्थ क्रमांक पटकावत यश संपादन केले.
या स्पर्धेच्या समारोपप्रसंगी मा. श्री. दीपक रावल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी झालेल्या सर्व स्पर्धकांना पदक प्रदान करून अभिनंदन करण्यात आले. स्पर्धेसाठी डॉ. आर. डी. मगदूम, श्री. समीर पठाण व श्री. अजित पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
शारीरिक शिक्षण संचालक डॉ. निशिगंधा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा पैलवान व तर प्रा. सतीश चव्हाण यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी क्रीडा विभाग व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
--------------------------

