मुरगूडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात वादावादी..दिवाळी पर्यँत स्थगितीचा विचार

Kolhapur news
By -

 

            




              कोल्हापूर न्यूज नेटवर्क   



मुरगूड नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये अतिक्रमणे हटवण्याच्या प्रश्नावरून वादावादी पहावयास मिळाली. अधिकाऱ्यांच्या मते नागरिकांनी दिलेल्या तक्रारी व वरिष्ठ पातळीवरून  आलेले आदेश यांचा विचार करूनच अतिक्रमण  हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम फक्त मुरगूड मध्येच आहे असे नाही. महानगरपालिका असलेल्या मोठया शहरात सुद्धा सुरू आहे. ही एक कायदेशीर बाब आहे. रस्ता रुंदीकरणाचे वेळी सुद्धा अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. काहीजणांनी अवैध मार्गाने नगरपालिका हद्दीत अतिक्रमण करून आपले व्यवसाय सुरू केले आहेत तर कांहीनी घराभोवती कुंपणे घातली आहेत. शहराच्या विकासाच्या आड येणारी ही अतिक्रमणे हटवणे हे क्रमप्राप्त आहे.तशा नोटीसा संबंधितांना  देण्यात आल्या आहेत असे  अधिकाऱ्यांनी सांगीतले.


   लोक प्रतिनिधिं चे म्हणणे असे की व्यावसायिकांनी अवैध मार्गाने  ही अतिक्रमणे केली असली तरी त्यामागे पोट भरणे हाच उद्देश आहे. आता दिवाळी तोंडावर आली आहे. याच वेळी त्यांचा व्यवसाय होतो व वर्षभराची संसाराची बेजमी होते. दिवाळी नंतर आम्हीं  सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत अतिक्रण हटाव मोहिमेत सहभागी होऊ. सद्या त्यांच्या पोटावर पाय द्यायला नको.


    दोन्ही बाजूनी मुद्दे उपस्थित झाल्याने सदरची मोहीम अनधिकृत व्यापऱ्यासाठी दिवाळी नंतर घेण्यात येईल असे समजते..


      लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुहासिनी देवी पाटील, नगरसेवक सत्यजित पाटील,नगरसेवक सम्राट मसवेकर यांनी या कामी समायोचित मधस्थी केली असे सांगण्यात आले.








              ----------------------