बाबा बागेश्वर आणि दामोदर यादव यांच्यातील वाद नेमका काय आहे.?

Kolhapur news
By -

 

      


           कोल्हापूर न्यूज  /  वि.रा.भोसले



भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावे अशी मागणी करणारी चळवळ बाबा बागेश्वर यांनी सुरू केली आहे. आपली मागणी रास्त आहे हे पटवून देण्यासाठी त्यांनी खालील मुद्दे मांडले आहेत.

1.भारत 1947 ला स्वतंत्र झाला. मुस्लिम धार्मियांसाठी पाकिस्तान आणि पूर्व बंगाल देऊन देशाची फाळणी करण्यात आली. हे दोन देश आणि असे 56 मुस्लिम देश जगात आहेत. ख्रिश्चन देशांची संख्या  त्याहून अधिक आहे.

फाळणीनंतर भारताला मात्र धर्मनिरपेक्ष( secular ) राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. घटना समितीने भारतीय संस्कृतीचे यथोचित दर्शन घटने मध्ये केले आहे. प्रभू रामचंद्र यांचे चित्र पहिल्याच पानावर आहे. 

   बाबा बागेश्वर म्हणतात धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणजे राम राज्य असावे असा याचा अर्थ आहे.हिंदू हा धर्म नाही. हिंदू ही एक जीवन पद्धती आहे. सर्व धर्म सहिष्णूता हे जीवन पद्धतीचे वैशिष्टय आहे.म्हणून हे राष्ट्र हिंदू राष्ट्र असे घोषित व्हावे.हिंदूंसाठी जगात हे एकमेव राष्ट्र उरले आहे.


कांही विदेशी कट्टर पंथी या राष्ट्राला मुस्लिम राष्ट्र करण्याच्या प्रयत्नात आहेत.त्यांना साथ देणारे कांही कट्टर पंथी आपल्या देशात सुद्धा आहेत. त्यांना आम्हीं देशद्रोही मानतो. देशातील राष्ट्रप्रेमी मुस्लिम, ख्रिश्चन, शिख समुदाय या सर्वांचा हिंदू धर्म सन्मान करतो.

त्यांची घोषणा सुद्धा अर्थपूर्ण आहे.


 "जात पातकी करो बिदायी.

   हम सब हिंदू भाई भाई."


बाबा बागेश्वर यांच्या ट्रस्ट मार्फत अति गरीब व आदिवासी मुलांच्या साठी गुरुकुल पद्धतीने शिक्षण संस्था चालवली जाते. 200 खाटांचे मोफत कॅन्सर हॉस्पिटल काम सुरू आहे. अति गरीब  अनाथ मुलींचे कन्या विवाह मठामार्फत मोफत केले जातात. हजार कन्यविवाहांचा संकल्प आहे.


दामोदर यादव कोण आहेत?


  दामोदर यादव हे एक मध्य प्रदेशातील चळवळीतील नेते आहेत.विशेषत: दलित आणि मागास वर्गीय समाजासाठी काम करतात. आपल्या कडील दलित मित्र सारखे हे कार्य आहे. शासकीय सवलती उचलणे एवढेच काम. बाकी दलित वस्तीत कधि पाऊलही ठेवलेले नसते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आपण पाईक असल्याचे ते सांगत असले तरी 

दामोदर यादव हे ऑल इंडिया यादव महासभेचे सरचिटणीस आहेत.ते यादव समाजाचे काम मात्र नेटाने  करतात.


    दामोदर यादव व बाबा बागेश्वर यांचा वाद का?


     बाबा बागेश्वर यांनी अडीच वर्षांपूर्वी रामकथेत श्रीकृष्ण यांचे विषयी वादग्रस्त विधान केले.


" हमारे वाले राम सीधे साधे और तुम्हारे वाले कन्हैया  टेढे है. "


    धनुष्य आणि बासरी याबद्दल देखील ते बोलले.


    कृष्ण भक्तांना ही विधाने बोचणारी ठरली होती. बाबा बागेश्वर यांच्याअनेक अनुयायांना सुद्धा ती आवडली नव्हती.  बाबा बागेश्वर यांना आपली चुक कळाली. त्यांनी टीव्ही वर जाहीर माफी मागितली. 

   सन 2027 ला उत्तरप्रदेश च्या निवडणुका आहेत. तेथे यादव समाज मोठया प्रमाणात आहे. यादव स्वतःला यदुवंशीय म्हणजे कृष्णाचे वंशज समजतात. बाबा बागेश्वर यांच्या सनातन चळवळी कडे ते वळलेले दिसले.


    समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दामोदर यादव यांना पुढे करून बाबा बागेश्वर यांच्या विरुद्ध रान उठवायला सांगितले.


    दामोदर यादव यांनी बाबा बागेश्वर यांच्या कथेत गोंधळ  घातला व त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न  केला.सुरक्षा रक्षकांनी त्यांना तेथून पळवतच  सुरक्षित ठिकाणी नेले.

  सोशल मीडिया वर हे व्हिडीओ प्रसारित झाले.

    थोडक्यात दामोदर यादव आणि बाबा बागेश्वर यांच्यातील हा वाद युपी च्या संभाव्य निवडणुकीशी निगडित आहे.


    धर्म, देश आणि देव हे वेगळे विषय आहेत. ते राजकारणा पासून अलिप्त असले पाहिजेत.

 

             -------------------------