कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
महिला शिक्षिका घरातील सर्व जबाबदारी सक्षम पणे पेलत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी सर्वांगीण विकासाकरिता देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार महिला सभापती मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केले.शिक्षक संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेच्या संचालिका सौ लक्ष्मी पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सभापती महोदय यांच्या समोर मांडल्या .
करवीर तालुक्यातील सर्व शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू तसेच पालकमंत्री माननीय सतेज पाटील साहेब शिक्षक आमदार मा.जयंत असगावकर यांच्या कुशल नेतृत्वात शिक्षण क्षेत्रातील समस्यांची सोडवणूक करण्याकरता प्राधान्याने काम करू ,अशी सभापती यांनी ग्वाही दिली.
यावेळी सौ छाया पानारी ,सौ निशा नातू,सौ जयश्री पाटील ,सौ माधवी पाटील, सौ सुनिता सुतार , सौ.शैलजा गरडकर, सौ शुभांगी सुतार यांनी शैक्षणिक समस्या बाबत चर्चेत सहभाग घेतला.
सर्वांच्या हस्ते नूतन सभापती माननीय मीनाक्षी पाटील वहिनी व त्यांना साथ देणारे सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील साहेब यांचा सत्कार श्री बाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला...
