'चिखली इंग्लिश स्कूल चिखली' च्या कु.भूमिका बाजीराव पोवार ने दातृत्वातून साजरा झाला आदर्श वाढदिवस....

Kolhapur news
By -

        कोल्हापूर न्यूज /  प्रतिनिधी

     चिखली इंग्लिश स्कूल चिखली या शाळेची विद्यार्थींनी कु. भूमिका बाजीराव पोवार हिने आपल्या वाढदिवसानिमित्त गोळ्या चॉकलेट वाटण्याऐवजी.... 

    अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज  यांची मूर्ती, शाळेच्या ग्रंथालयास दोन पुस्तकें, तसेच काळाची गरज जाणून मास्क, सामाजिक भान लक्षात घेऊन दातृत्वाच्या भावनेने ५  स्कूल बॅग भेट देऊन आदर्श निर्माण केला.


        मुख्याध्यापक एस. एस. मगदूम  यांनी भूमिकास सुयश चिंतिले.  याप्रसंगी  भूमिका चे वडील व माजी सैनिक बाजीराव पोवार,  सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
         शालेय जीवनात मुलांच्या मध्ये मुल्ये  रूजवण्यासाठी अशा  घटना उपयुक्त ठरत असतात ..