राज ठाकरे विना मास्क विवाह समारंभात ; स्वागतासाठी गेलेल्या नाशिकच्या माजी महापौरांना ही काढावयास लावला मास्क

Kolhapur news
By -
     

    कोल्हापूर न्यूज  /  प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आहे . तब्बल सव्वा वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आले . 


      भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी ते उपस्थित राहिले होते . पण त्यांनी स्वतः मास्क घातलेला नव्हता . इतकेच काय तर... त्यांचे स्वागत करण्यासाठी गेलेले नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही त्यांनी मास्क काढण्याचा इशारा करताच त्यांनी तातडीने आपला मास्क काढला.