' छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, लिखेंगे मिलकर नही कहानी...' असे म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मुलाखतीमध्ये काय प्रतिक्रिया दिली...ते वाचा

Kolhapur news
By -
  

    कोल्हापूर न्यूज  /  प्रतिनिधी

     हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये १९८० ते ९० या दशकामध्ये अधिराज्य गाजवलेला अभिनेता म्हणजे शत्रुघ्न सिन्हा..  
     शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकत्याच  दिलेल्या  आपल्या मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांच्याबाबत काही खुलासे केले आहेत..त्यामध्ये त्यांनी 'दिवार', 'शोले' आणि  'सत्ते पे सत्ता'  असे अमिताभ बच्चन यांचे गाजलेले  चित्रपट हे शत्रुघन सिन्हा  यांना सुरुवातीला मिळाले होते. पण त्यांनी ते नाकारल्यामुळे 'अमिताभ' कडे ते  चित्रपट गेले आणि कमालीचे हिट झाले असा खुलासा त्यांनी केला आहे .
     रमेश सिप्पी यांच्या गाजलेल्या शोले चित्रपटातील 'जय' च्या भूमिकेबद्दल सुरुवातीस शत्रुघन सिन्हा यांनाच निवडले होते . पण त्यांच्या अडचणीमुळे ते ही भूमिका करू शकले नाहीत. तरीपण रमेश सिप्पी आणि आपण चांगले मित्र आहोत असेही त्यांनी या मुलाखतीमध्ये नमूद केले. 
 
     या गोष्टीला अनुसरून त्यांना  विचारण्यात आले की , अमिताभ बच्चन यांच्याबरोबर आपला वाद होता काय?  यावर त्यांनी ' अजिबात नाही ' असे उत्तर दिले. एक काळ असा होता की , आम्ही दोघेही हिंदी चित्रपट क्षेत्रात सुपरस्टार म्हणून ओळखले जात होतो . तरीही माझ्या मनात आमिताभ  यांच्याबद्दल कोणताही आकस भाव नव्हता  व  आजही नाही...मी नेहमी अमिताभ यांचा सन्मानच केला आहे...आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात केवळ प्रेम आणि आदर आहे.  पण  चित्रपट जगतामध्ये अशा काही चुकीच्या अफवा पसरवल्या जात असतात  की  ज्याकडे दुर्लक्षच करायला पाहिजे . तरीपण काहीजण विचारतात त्यावेळेला मी त्यांना सांगू इच्छितो की , 'छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, लिखेंगे मिलकर नही कहानी..