कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
जिल्ह्यात सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्याने काही शिक्षक संघटनांनी सकाळच्या सत्रात शाळा सुरू करणे बाबत या कार्यालयाकडे विनंती केलेली आहे. त्यास अनुसरून आपणास कळविणेत येते की, दि. १५.०३.२०२१
पासून माध्यमिक शाळा संहिता नियम ५४ मध्ये नमुद केले प्रमाणे या शैक्षणिक सत्राच्या अखेर पर्यंत सकाळच्या सत्रात ७.३० ते १२.०० या वेळेत शाळा भरविण्यास परवानगी देण्यात येत आहे असे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी पत्राद्वारे कळवले आहे .
इ.१० वी व १२ वी च्या परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होत आहेत. सदर वर्गाच्या सर्व विषयाच्या अभ्यासक्रमाचे अध्यापनाचे काम १०० टक्के पूर्ण करणे अनिवार्य आहे. तसेच इ.५ वी ते ९ वी व इ. ११
वो या वर्गाच्या सत्र २ च्या परीक्षा आपल्या शाळेने घ्यावयाच्या असल्याने या वर्गातील सर्व विषयांचा १०० टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे. यासाठी सकाळच्या सत्रात स्थानिक परिस्थितीस अनुसरून अध्यापनाच्या
कामाचे तास वाढविण्यास हरकत नाही. अभ्यासक्रम अपूर्ण राहिल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास आपणाविरूद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. शासन परिपत्रक दि. १०.११.२०२० व दि. १२.०१.२०२१ मधील सूचनांचे अनुपालन करण्यात यावे असेही या पत्रात नमूद केले आहे.
