बेळगावच्या शिवसेना प्रमुखांच्या वाहनाला काळे फासण्याचा प्रयत्न; बोर्ड तोडला ; सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया

Kolhapur news
By -
      कोल्हापूर न्यूज  /  प्रतिनिधी

बेळगावच्या शिवसेना प्रमुखांच्या
वाहनाला काळे फासण्याचा प्रयत्न; बोर्ड
तोडला. 
  बेळगाव शहरातील रामलिंग खिंड येथील
शिवसेना प्रमुखांच्या वाहनावर कन्नड
संघटनेच्या कार्यर्त्यांनी हल्ला चढविला
आहे. पोलिस संरक्षण असतानाही हा
प्रकार घडल्यामुळे सीमाभागात संतप्त
प्रतिक्रिया उमटत आहे. वाहनाचा बोर्ड
तोडण्यात आला आहे. यावेळी गाडीला
काळे फासण्याचा प्रयत्न होत असताना
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले
आणि पळवून लावले.
       यानंतर खडेबाजारचे पोलिस घटनास्थळी
दाखल झाले आहेत. बेळगावची शांतता भंग
करण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी सुरु
केलायं. शुक्रवारी दुपारी सम्राट अशोक
चौकाजवळ शिवसेनेच्या वाहनाला काळे
फासण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोखण्यास
गेलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश
शिरोळकर तसेच शिवसैनिक प्रविण तेजम
यांनाही रोखण्याचा प्रयत्न झालायं. यावेळी
जोरदार वादावादी झाली आहे.