कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
महाराष्ट्रर लोकसेवा आयोगाच्या वतीने १४ मार्च रोजी घेतली जाणारी परीक्षा आता २१ मार्च रोजी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले .
ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये मोठे आंदोलन केले होते . या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कालच मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आजही २१ मार्च ची तारीख जाहीर करण्यात आली.
