लाँकडाऊन कालावधीतील वीज बिल माफ करावे ; कागल तालुका वंचित आघाडीच्यावतीने मागणी

Kolhapur news
By -
    कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी

कोरोनो रोगाचा प्रार्दुर्भाय लक्षात घेता केंद्र शासन व राज्य शासनाने देशात व राज्यात मार्च २०२० पासुन लाकडाऊन घोषीत केले होते. सदरचे लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनता तीन ते चार महीने घरीच थांबुन होती. त्यामुळे सदर कालावधीतील वीज बिल माफ करावे अशी मागणी कागल तालुका वंचित आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. 
    सदर कालावधीत सर्वसामान्य माणसाचे जगण मुश्कीलीचे व जिकीरीचे होते. त्यामुळे
सदर लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनतेने खुप हालाखीत आपला व आपल्या
कुटूंबाचा उदरनिर्वाह, गुजराण केली आहे. शासनाने तुटपंजे लाभ देवुन त्यांच्या
तोंडाला पाणे पुसली आहेत. यातुन तो आता सावरुन आपल्या कुटुंबासह पुर्वपदावर
येण्याचा अटोकाट प्रयत्न करीत असताना आपल्या राज्य शासनाने सर्वसामान्य
जनेतस विज बीलांचा शॉक दिला आहे.
सर्वसामान्य जनतेस केंद्र व राज्य शासनाने केलेले लाकडाऊन मुळे घरात बसाव लागले होते. 
   त्यामुळे त्याचा आर्थीक सोर्स खुंटला होता. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेमुळे आज तो आर्थीकदृष्टया मेटाकुटीला आला आहे. कुटुंबाचा
उदरनिर्वाह, कर्ज,मुलांचे शिक्षण व इतर गरजा भागवता भागवता तो मेटाकुटील
आला आहे. तरी सदर सर्व सामान्य जनतेचे जीवनमानाचे भान राखता लाँक डाऊन काळातील विज बिल पूर्णपणे माफ करावे अशा आशयाचे निवेदन वंचित आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या  मुख्यमंत्र्यांना  लिंगनूर कापशीच्या महावितरणचे  कनिष्ठ अभियंता नवनाथ डवरी यांच्यामार्फत पाठवले आहे.