कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
(१९) ६९१७ श्री.सुरेश धस, श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण
मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :(१) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात
आला असून शाळा व शिक्षकांना लागू करण्यात आला नाही, हे खरे आहे
काय,
(२) असल्यास, सदरहू शिक्षक वर्गावर अन्याय होत असून विद्यार्थ्यांसाठीही |
पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी शिक्षक संघटना आग्रही मागणी करीत
आहेत, हेही खरे आहे काय,
(३) तसेच, शिक्षण संचालक आणि शिक्षण सचिव यांनी मान्यता देऊनही
राज्यातील शाळांना पाच दिवसाचा आठवडा करण्याबाबत अमलबजावणी
झाली नाही, हे ही खरे आहे काय,
(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करुन शाळेलाही दररोज
अर्धा तास वाढवून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यासाठी कोणती
कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?
प्रा. वर्षा गायकवाड : यांचे उत्तर
(१) होय.
(२) शाळांना ५ दिवसांचा आठवडा करण्याबाबतची निवेदने प्राप्त झाली
आहेत.
(३) शिक्षण संचालक आणि शिक्षण सचिव यांनी मान्यता दिलेली नाही,
त्यामुळे अंमलबजावणीचा प्रश्न उद्भवत नाही.
(४) व (५) राज्य शासकीय कार्यालयांसाठी ५ दिवसांचा आठवडा लागू
करण्याबाबत निर्गमित केलेल्या दिनांक २४/०२/२०२० शासन
निर्णयासोबतच्या परिशिष्ट
शाळाना दिवसाच्या
आठवड्याबाबतचे आदेश लागू राहणार नाहीत असे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबत शासनस्तरावर कोणतीही कार्यवाही प्रस्तावित नाही.
