देवचंद कॉलेज समोरील श्री संत बाळूमामा नगरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

Kolhapur news
By -
कोल्हापूर न्यूज   /  प्रतिनिधी

      देवचंद कॉलेज समोर असणाऱ्या श्री संत बाळूमामा नगरमध्ये पुन्हा पुन्हा कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहेेेेे. पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यास याविषयी वेळोवेळी कल्पना देऊन हे येरे माझ्या मागल्या हा प्रकार  पुन्हा सुरूच आहे. 
      श्री संत बाळूमामा नगर मध्ये जवळपास 40 कुटुंब वास्तव्यास आहेत . जवाहर तलावांमध्ये पुरेसा पाणी साठा असताना ....विजेची कोणतीही अडचण नसताना ....पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.