कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त....
सौ.हेमा संजय कांबळे ( आशा गटप्रवर्तक - प्रा .आ. केन्द्र गारीवडे . ) यांची मुलाखत
खरंतर जागतिक महिला दिन हा माहिलांना एक वेगळ व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे . माझ्यासारखी आशागटप्रवर्तक सर्वसामान्य स्त्री माझे मत व्यक्त करत आहे
जीवनातील वास्तव हे कधीच कोणीही हिरावू घेऊ शकत नसत .एखादया माहिलेला अस काही साधन हवं असत , की ज्यातून तिच्या मनाच्या पोकळीमध्ये जे विचार ठेवलेले असतात , ते सर्वांच्या समोर मांडता यावे . आणि ते मी या माध्यामाद्वारे आपल्यासमोर व्यकत करीत
आहे .
शिवरायांना कणखर बनवणारी राजमाता जिजाऊ' स्त्री शिक्षणाची मशाल हाती घेतलेल्या क्रातीज्योती सावित्रीबाई फुले .व
गोवऱ्या शेणी थापून ' पैसे जमवून डॉ . बाबासाहेब आंबेडकराना बॅरिस्टर करणाऱ्या माता रमाबाई त्यांना अभिवादन करून मी माझ्या सर्व भागिनीना एवढच सागते की, स्वतःसाठी, आपल्या कुटूबासाठी या समाजासाठी काहीतरी केले पाहिजे . वेळेचे नियोजन केले पाहिजे .
जेव्हा तुम्ही घरच्या उबंरठ्यच्या बाहेरचे जग पहाल तेव्हा तुम्हाला ते किती सुंदर आहे हे समजेल व तुमचा आत्मविशवास वाढेल . या सुंदर जगात मला काहीतरी माझं अस्तीत्व निर्माण करायचे आहे . ज्यांचा फायदा इतरांनाही होईल .
आजपर्यतच्या नोकरीच्या काळात अनेक जिल्हास्तरीय पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले आहे हे माइया कुटूबाचे श्रेय आहे.
मी गेल्या ११ वर्षापासूनच्या सेवेमध्ये २१ आशा -स्वयसेविकेचे नेतृत्व करते . कधी बाहेर न पडलेल्या आशा आता इव्हेट करतात . आरोग्य सेवेच्या माध्यातून समुपदेशन करतात . मला गर्व आहे की मी आरोग्य सेवेचे व्रत देतच आहे . पण त्या एकवीस जणीचे मनोधेर्य ही वाढवत आहे . गगनबावडा तालुक्यासारख्या दुर्गम आणि डोगराळ भागात सेवा देणे फार कठीण आहे . पण मी थांबणार नाही . आयुष्यभर निरंतर आरोग्यदायी सेवा देतच राहीन .
खरच खूप धन्य वाटले ....जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या अशा कार्यक्रमाच्या माध्यामातून आम्हाला व्यकत होण्याची जी संधी उपलब्ध करून दिली . त्यातून मनाच्या कोपऱ्यात लपलेल्या इच्छा ' विचारांना मोकळीक मिळाली . हीच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट वाटते .
वृत्तसंकलन -रघुनाथ दळवी -गगनबावडा
