नानीबाई चिखली येथील जळीत जनावरांच्या गोठ्यास ना.हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने दिला मदतीचा हात....

Kolhapur news
By -
    कोल्हापूर न्यूज  /  भाऊसाहेब सकट

नानीबाई चिखली येथील शेतकरी  आप्पासो राऊ गळतगे यांच्या जनावरांच्या गोट्याला अचानक आग लागून, त्यांची दोन दुभती जनावरे गायी मयत झाल्या  होत्या. तसेच संपूर्ण गोठा जळून खाक झाला, त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले. याविषयीचे वृत्त दैनिक पुढारी च्या दि. ४ मार्च २०२१  अंकात प्रसिद्ध झाले होते. 

   या घटनेची माहिती मिळताच ना.हसनसो मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने प्रत्यक्ष भेट देऊन गळतगे कुटुंबीयांना मदतीचा हात दिला.

    यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रविणदादा भोसले, बशीर नदाफ, श्रीशैल नुल्ले, मुकुंद गळतगे, योगेश तुकान, राजू चौगुले व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.