महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष, विजयसिंह गायकवाड सर यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रावर शोककळा

Kolhapur news
By -
   
    
      कोल्हापूर न्यूज  / प्रतिनिधी

       महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष, विजयसिंह गायकवाड सर यांचे नुकतेच  निधन झाले . गायकवाड सरांच्या अचानक जाण्यामुळे  महाराष्ट्रातील संपूर्ण माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षण क्षेत्राावर शोककळा पसरली आहे. 
     हा आघात संपूर्ण शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या बांधवांना धक्कादायक असा आहे. उत्तम वक्ता, नम्रता, अभ्यासाची जोड, सर्वांशी आपलेपणाचे संबंध  ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये होती.  त्यांच्या महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अनेक  कामे मार्गी लागलेली आहेत. 
महाराष्ट्रातील शाळांना व  त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना दिशा देण्याचे काम गायकवाड सरांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे. 
      कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि विजयसिंह गायकवाड सर यांचा ऋणानुबंध गेल्या अनेक वर्षांपासून हाेता.संघटनात्मक कामात झोकून देऊन काम करणारा , शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत प्रश्र्नाना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे  व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.मुख्याध्यापक संघ महामंडळाला उर्जितावस्था आणण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. कोल्हापूर जिल्ह्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्या निधनाने  मुख्याध्यापक संघ महामंडळामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. 
    सेवानिवृत्त झाल्यानंतर ही  ते शिक्षकांच्या प्रश्‍नांच्यासाठी  झटत होते  हे विशेष. 

    त्यांच्या आत्मास चिरशांती लाभो ही  ईश्वरचरणी प्रार्थना.