गगनबावडा पंचायत समितीच्यावतीने राष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोव्हीड योध्दाचा सत्कार .

Kolhapur news
By -
    कोल्हापूर न्यूज  / अणदूर प्रतिनिधी

       गगनबावडा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आंतर राष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई  फुले  याच्या प्रतिमेस  मान्यवरांच्या   हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले . 
      गगनबावडा तालूक्यातील आठ  ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच व ग्रामपंचायतीचं सदस्य ' कोव्हिड योद्धा  यांचा सत्कार सभापती संगीता पाटील  जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील व इतर मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आला .

      यावेळी जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील म्हणाले . महिला भगिनींना गावगाडा चालविण्यासाठी ग्रामस्थांनी निवडून दिलं आहे . त्यामुळे कुंटुबाबरोबर गावगाडयाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आदर्श गाव तयार करतील असा विश्वास आहे .गावासाठी झोकून काम केलं  तर  तुमच्या मधून चांगले व्यक्तिमत्व समोर यायला फारसा वेळ  लागणार नाही . 
      ज्या पद्धतीने महिलांना सक्षम करण्याची भूमिका सरकारने स्वीकारली आहे त्या अनुषंगाने तुम्हाला सक्षम करण्याचा पर्याय सरकार निवडला  आपण सर्वजण त्या दिशेने विकास कामे केली पाहिजे असे मत व्यक्त केलं .
            यावेळी सभापती  संगीता
पाटील म्हणाल्या , महिला सक्षम असल्याने कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे आहेत . त्यामुळे झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज असल्याचे सांगितले . ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले याच्यामुळे आपणाला व्यासपीठ मिळाले आहे .त्यामुळे आपणास मिळालेल्या संधी सोने करून सामाजिक बांधीलकी जोपासत आपल्या गावाबरोबर देशाचे नाव उज्वल करू या . सध्या काळात महिलांनी संघटिक राहण्याचे गरज आहे त्यामुळे संघटीक राहा सक्षम राहा , गाव घडवा ' देश घडवा  . 

      यावेळी वैदेही पाटे यांनी महिलांच्या बद्ल समस्या ' आरोग्य  ' इतर माहिती बदल माहिती सांगण्यात आलं . दरम्यान गारीवडे बीटअंगणवाडीच्या सेविका, मदतनीस आणि पालक याच्यावतीनं लेक वाचवा नाटीकेचे सादरीकरण करण्यात आलं .
      दरम्यान निवडे ग्रामपंचायतीला  जिल्हा परिषदेचा  स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबदलं विशेष सत्कार करण्यात आला .
द्वितीय सत्रात कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केलेबदल डॉ . पुजा भोई ,आरोग्य सेविका , सायरा एकसंबेकर , इंदिरा पुजारी , आशा गटप्रर्वतक सौ . हेमा कांबळे , आशा स्वयसेविका सौ . सुनिता पाटील यांचा कोरोना योधा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .

       यावेळी उपसभापती पांडुरंग भोसले '   भगवान पाटील .पंचायत समिती सदस्या मंगल कांबळे , पंचायत समिती सदस्य आनंदा पाटील , गटविकास अधिकारी  शरद भोसले , प्रास्ताविक रघुनाथ चौगले याच्यासह मुटकेश्वर ' असंडोली , किरवे , कातळी ; वेतवडे , सांगशी , गगनबावडा या ग्रामपंचायतीचे नुतन ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते .