कोल्हापूर न्यूज / भाऊसाहेब सकट
सुभाष खंडागळे हे औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत.
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख .८ मार्च रोजी आई गावची सरपंच झाली म्हणून
गावात शोभायात्रा म्हणजेच भव्य मिरवणूक काढली . कुटुंबासोबत गाव देखील आनंदात होते. आईच्या विजयाचा जल्लोष करत असताना सुभाष खंडागळे हे अचानक खाली
कोसळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात
हलविण्यात आले. परंतू , उपचारासाठी
नेतानाच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
सकाळी घरातून, गावातून शोभायात्रा
निघाली तेथूनच अंत्ययात्रा काढण्याची
दुर्दैवी वेळ खंडागळे परिवार आणि गावावर
आली. नियतीलाही त्यांचे हे सुख पाहावले
नाही असेच म्हणावे लागेल.
