कोल्हापूर न्यूज / भाऊसाहेब सकट
ग्रामपंचायत चिखलीच्या वतीने बसवेश्वर हॉल या ठिकाणी जागतिक महिला दिन संपन्न झाला . यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या प्रथम नागरीक सरपंच सौ. छाया चव्हाण होत्या. यावेळी प्रमुख़ मार्गदर्शक म्हणुन प्रा.आ.केंद्र च्या संध्या कांदणे सिस्टर होत्या . त्यांनी महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी गावतील महिला , विध्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कु.वि.मंदिर येथील शिक्षीका सौ. ज्योती कांबळे यांनी यावेळी महिलांच्या मधुन मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत चिखली यांच्या वतीने सर्वाना भेट वस्तू म्हणून – स्टीलचे फुलपात्र ( वाण ) १२५ उपस्थित महिलांना वाटप करणेत आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून चिखली गावातील पहिल्या अंगणावाडीमध्ये सेविका म्हणुन उकृष्ठ काम करून सेवेतून निवृत्त झालेबद्द्ल प्रेमिला पोतदार यांचे गावासाठी केलेल्या सेवेबद्द्ल त्यांचा सत्कार करणेत आला. तसेच कु.रेवती वडगुले ही कन्या केंद्रीय पोलीस दलामध्ये परिक्षेत उत्तीर्ण झालेबद्द्ल सर्वांच्या वतीने तिचा सत्कार करणेत आला .
यावेळी ग्रामविकास अधिकारी जालिंदर बुवा ,उपसरपंच मनिषा पाटील,शोभाचौगुले,साधना जाधव ,ज्योती डवरी ,जया गळतगे ,सरस्वती चिखलीकर , रविंद्र कस्तुरे , विजय घस्ती , युवराज कुंभार आदी ग्रा.पं. सदस्य व सदस्या उपस्थित होते . यावेळी स्वागत सुरेखा बुरूड यांनी केले. ग्रा.पं.सदस्या साधना जाधव यांनी प्रास्ताविक केले . सुत्रसंचालन संगणक परिचालक विशाल चिखलीकर यांनी केले. आभार ग्रा.पं.सदस्या शोभा चौगुले यांनी मानले.
दरम्यान , नानीबाई चिखली येथील आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सविता पाटील यांनी कु. रेवती वडगूले हिची केंद्रीय पोलीस दलामध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
