बेळगाव जिल्हा प्रशासनास चकवा देत कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी केला बेळगाव जिल्ह्यात प्रवेश : आणि फडकवला भगवा ध्वज

Kolhapur news
By -
 

      कोल्हापूर न्यूज  /  भाऊसाहेब सकट

     सीमाभागातील मराठी भाषिकांच्यावर कर्नाटक शासनाचा जो अन्याय व दडपशाही सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे हे बेळगाव जिल्ह्यामध्ये जाणार होते पण बेळगाव जिल्हा प्रशासनाने त्यांना १०  मार्च पर्यंत बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. 
         पण कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनास चकवा देत सोमवार दिनांक ८ मार्च रोजी बेळगाव  जिल्ह्यातीलच हादनाळ या गावी  सहकाऱ्यांच्या समवेत जाऊन चौकात भगवा ध्वज फडकवला. आणि कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.