कोल्हापूर न्यूज / इस्लामपूर प्रतिनिधी
मातंग समाजाच्या विकासासाठी नेमण्यात आलेला क्रांतिवीर संघर्ष लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग व त्या अभ्यास आयोगाने सुचविलेल्या शिफारसी मातंग समाजाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य असून,
शासनाने त्याची अंमलबजावणी अजून का केली नाही ? हा जाब विधानसभेमध्ये आपण विचारला पाहिजे ......मातंग समाजाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करत असताना आणि सत्तेत काँग्रेस पक्ष असताना आपल्याला जर हे जमत नसेल तर ... पुरोगामी संघर्ष परिषद आयोगाच्या लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी का होत नाही हा जाब विचारण्यासाठी मंत्रालयात घुसायला मागेपुढे बघणार नाही असा सज्जड दम भरला पुरोगामी संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी.
पुरोगामी संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान
आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचेशी कराड येथील शासकीय विश्रामगृहावर आले असता प्रा.वायदंडे यांनी मातंग सामाजाच्या प्रश्नावर संवाद साधला.
प्रा.वायदंडे पुढे बोलताना म्हणाले,
गेली दहा वर्ष मातंग समाज अभ्यास
आयोगाच्या शिफारशी पासून वंचित
राहिला असून येणाऱ्या भविष्यकाळात वारे
कोणत्या पक्षाबरोबर जायचे हे समाजाचं
काम करणाऱ्या राज्यातील अनेक इत्यादी
संघटना यावर एकत्र येऊन विचार करून निर्णय घेतील यांचं प्रत्यक्ष नेतृत्व पुरोगामी संघर्ष परिषद करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे सांगली जिल्हा संपर्कप्रमुख अमर शिंदे , पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अमोल लांडगे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष सावळा खुडे, सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अक्षय खुडे, आटपाडी तालुका मीडिया प्रमुख संतोष रणदिवे , मल्हारी भंडारे, सर्जेराव भंडारे, बबन मोरे , सातारा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड , कराड तालुका अध्यक्ष विजय सावंत, पलुस तालुका अध्यक्ष राहुल वारे, खानापूर तालुका अध्यक्ष प्रशांत जाधव, अंकुष भोंडे, कृष्णा चव्हाण आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
