कोल्हापूर न्यूज / प्रतिनिधी
राधानगरी तालुका अध्यक्ष नाथा डवरी तुरंबे यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कामे करून देण्यासाठी आपण वचनबध्द आहोत असे सांगितले .तसेच सावर्दे शाखेचे अध्यक्ष गुंडू डवरी यांनी या सकल नाथपंथी समाज संघटना महाराष्ट्र चे कार्य योग्य प्रकारे व चिरंतर चालू ठेवून समाज कार्य करणार असल्याचे सांगितले .तसेच सावर्दे गावचे सरपंच बाळासाहेब धोंड व पोलीस पाटील धनाजी कांबळे यांनी या सकल नाथपंथी समाज संघटना महाराष्ट्र यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना गाव पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कामे करून देण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे सांगितले.
या वेळी उपस्थित सकल नाथपंथी समाज संघटना महाराष्ट्र चे राज्य सचिव दत्तात्रय डवरी कूर, पुणे विभागीय प्रमुख विजय डवरी, पोलिस पाटील बाळासाहेब धोंड, तुकाराम यादव, ग्रामपंचायत सदस्या- सौ शाहुताई पाटील,सौ अनिता तळेकर,सौ संध्या हाळवे,सौ नम्रता कामते,सौ गिता गुरव, सदस्य रंगराव सुतार, बळवंत कामते इत्यादी तसेच संघटना शाखेचे अध्यक्ष गुंडू डवरी, उपाध्यक्ष नेताजी डवरी, सचिव अजित डवरी, प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग डवरी तसेच सकल नाथपंथी समाज संघटनेचे सर्व सदस्य सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.
