कोल्हापूर न्यूज / अणदुर प्रतिनिधी रघुनाथ दळवी
ज्या समाजामध्ये लहानाचे मोठे झालो , ज्या शाळेने ज्ञानाचे धडे दिले त्या शाळे प्रति समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून धुंदवडे ( ता. गगनबावडा) या प्राथमिक शाळेला समाजसुधारकांचे चाळीस फोटो शाळेचे माजी विद्यार्थी संभाजी पाटील यांच्याकडून प्रदान करण्यात आले.
दयानंद ग्रामीण ग्रंथालय , संभाजी ब्रिगेड गगनबावडा , विद्यामंदिर धुंदवडे शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ८ वी (एन .एम .एम .एस ) सराव चाचणी परीक्षेच्या आयोजित शाळेचे मुख्याध्यापक जी .एम. पालव यांच्याकडे हे फोटो सुपूर्द करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गणपती पालव म्हणाले , इतर विद्यार्थ्यांनी देखील शाळेप्रति आदर बाळगून शाळेचा समाजाचा सर्वांगीण विकासासाठी सदैव तयार असावे . अशा पद्धतीने समाजभिमुख कार्य केल्यास विद्यार्थीप्रति शाळेसाठी खूपच प्रेरणादायी ठरेल असे गौरदूगार काढले .
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सराव चाचणी परिक्षेसाठी तुळशी , धामणी कासारी ,
खोरातून सुमारे २६० विद्यार्थीनी सहभाग नोंदवला होता . यावेळी धामणी खोऱ्यातून पोलीस भरती मध्ये यशस्वी झालेल्या तसेच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमास केंद्रप्रमुख गजानन कांबळे, पी एल पाटील , मुख्याध्यापक जी.एम.पालव, व्ही पी पाटील आर आर कागले , एस. एस . पाच्छापूरे , संभाजी पाटील ,प्रकाश गोते, गोरख चौगुले अर्जुंन वडाम, विठ्ठल चौकेकर उपस्थित होते . सूत्रसंचालन प्रकाश गोते यांनी केले तर आभार संभाजी पाटील यांनी मानले .
धुंदवडे ता गगनबावडा येथील प्राथमिक शाळेस समाज सुधारकांचे फोटो सुपुर्द करताना संभाजी पाटील व मान्यवर
