अणदूर प्रतिनिधी रघुनाथ दळवी
गगनबावडा तालुक्यातील निवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्वांग सुंदर दवाखाना या उपक्रमासाठी जिल्हा आरोग्य पथकाच्या वतीने पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा माता बालसंगोपन आरोग्य अधिकारी डॉ. फारुक देसाई, आरोग्य सभापती वंदना जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुर्गम अणि डोंगराळ भागअशी ओळख असणाऱ्या गगनबावडा तालुक्यातील निवडे
प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोना काळात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचं काम केलं . ग्रामीण भागात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देऊन तालुका आरोग्यधिकाऱ्याच्या
मार्गदर्शनाखाली आरोग्यदायी नविन्यपूर्ण उपक्रमातून भरीवदार कामगिरी केली . सर्वांत जास्त लसीकरण करण्यात येणारे
केंद्र तालुक्यात अग्रेसर ठरले. सर्वसामान्य जनतेला सेवा देऊन आपल्या कामाच्या जोरावर या केंद्राने स्वच्छ व सुंदर तालुका स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे जिल्हास्तरीय स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य कमिटीने केंद्राची पाहणी केली व केंद्राच्या कार्याचे कौतुक केले. विशेषतः कर्मचारी वर्ग कमी असूनही केंद्राने केलेल्या कार्याकडे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई व जिल्हा पर्यवेक्षक यांनी पर्यवेक्षण केले. तालुकाआरोग्यधिकारी डॉ .विशाल चौकाककर ,वैद्यकीय अधिकारी डॉ.वृषाली कारंडे ,विस्तारअधिकारीविजय सावंत ,अर्जुन इंगळे ,आरोग्य सहाय्यक हिरोजी गुरव,यांनी आपली मनोगत व्यक्त केले .यावेळी सभापती सौ संगीता पाटील ,उपसभापती पांडुरंग भोसले ,आरोग्य सहय्यिक इंदिरा पुजारी ,तालुका समूह संघटक उत्तम पाटील , आरोग्य सहा . अरुण मेथे,संभाजी दुर्गुळे ,नितीन राबाडे,आरोग्य सेविका शुभांगी कुंभार ,प्रियंका चव्हाण ,गटप्रवर्तक सौ . मनीषा जोंधळेकर सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .आभार हिरोजी गुरव यांनी मानले
निवडे ता. गगनबावडा येथीलप्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करताना .जिल्हा आरोग्य माता
बालसंगोपन अधिकारी डॉ . फारुख देसाई व
आरोग्य सभापती सौ वंदना जाधव व
मान्यवर
( छाया - रघुनाथ दळवी )
