कोल्हापूर न्यूज / व्ही आर भोसले
चारशे वर्षापूर्वी शिवछत्रपतींचे पाय मुरगुड ला लागले होते हा इतिहास आहे .रायगडावरील राज्याभिषेक झाल्या नंतर राजे दक्षिण दिग्विजयाला निघाले .
तामिळनाडूतील तंजावर पर्यंत त्यांनी राज्यविस्तार केला .
जातांना पाटगाव येथील मौनि महाराज या योगीपुरुषचे आशिर्वाद त्यांनी घेतले होते .
मुरगुडच्या दक्षिण दिशेने त्यांनी भुदरगड व नंतर पाटगाव जवळ केले . वेदगंगेच्या उगमापासून कांही अंतरावर त्यांनी वेदगंगा पार केली होती .
घोडदळा ला असाच मार्ग सोयीस्कर असतो .पुरामुळे वेदगंगला दुथडी पाणी वाहयचे.
हे सविस्तर सांगण्याचे कारण असे की मुरगुड नगरी स्वराज्य संस्थांपकांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक सोहळा तितक्याच भारदस्त पणे व्हावा व तो होणार याची खात्री आहे .
छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास केवळ वाचून किंवा शिकून उपयोगी नाही तर तो नव्या पिढीने आचरणातही आणला पाहिजे ,.
मुरगुड नगरीने स्वतः मध्ये खुप परिवर्तन केले आहे ,.सकाळी भल्या पहाटे पासून स्वच्छता गाड्या फिरत असतात .नुसत्या फिरत नाहीत तर अत्यंत सुरेल आवाजातील स्वच्छतेची महती सांगणारी गीते ही नागरिकांना ऐकवतात .
ती इतकी आशयसंपन्न असतात की बाळ कोल्हटकरांची 'उठी उठी गोपाळा 'ही सुप्रसिद्ध भूपाळी सुद्धा फिकी पडावी .
स्वच्छतेचे राष्ट्रीय पारितोषिक मिळवणाऱ्या या नगरीकडून शिवराज्याभिषेक सोहळा तितक्याच स्वच्छ वातावरणात होत आहे हे खास वैशिष्ट्य आहे .
अर्थात आचार आणि विचार यांची स्वच्छता ही तितकीच महत्वाची आहे .
मुरगुड मधील प्रत्येक कार्यक्रम उत्साहाने व एकजुटीने होत असतो .अण्णा हजारेंचे उपोषण ,मराठा मोर्चे ,इत्याजी सामाजिक चळवळींचे मुरगुडने भरभरून स्वागत केले आहे ,
उत्तमोत्तम परंपरा निर्माण करण्यात देखील मुरगुड शहर अग्रेसर राहिले आहे .
त्यापैकीच शिवराज्याभिषेक सोहळा ही नवीन परंपरा या शहरात सुरू होत आहे .
त्या निमित्ताने कांही नियमांचे पालन होणे गरजेचे आहे .शिवाजी महाराजांच्य पुतळ्या समोर किंवा परिसरात कसलेही फलक लागू नयेत.
मध्यवर्ती खांबाला लागून वाढदिवसाची पोस्टर्स सर्रास उभी केली जातात .
अभिनंदनाची पोस्टर्स पण असतात .
त्याला ,जाहिराती असतात , खाऊ किंवा किरकोळ विक्रेत्यांचे गाडे उभे राहू नयेत ,
सगळा परिसर नयनमनोहर वाटावा .
रस्तोरस्ती सुद्धा अशा पोस्टरची वाणवा नसते .लहान मुलांचाही त्यात समावेश असतो .
नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितलंय की फलक लावून मिळणारे मोठेपण तात्पुरते असते ,सामाजिक कार्यातून व जनसेवेतून मिळणारे मोठेपण हे टिकाऊ असते ,
शिवराज्याभिषेकाचा उत्सव म्हणजे शिवरायांचंच मोठेपण जपले पाहिजे .
ते जपलं जावे ही फक्त शहरवासीयांचीच नव्हे तर महाराष्ट्रातील शिवप्रेमींची अपेक्षा राहील .
समजा एखाद्या प्रशस्त प्रसन्न दालनात शिवराज्यभिषेकाचे सुंदर तैलचित्र लावले आहे आणि भान हरपून सर्वजण ते पहात आहेत.अचानक भिंतीवरची एखादी पाल त्या चित्रावर येऊन थबकली तर ते दृश्य ओंगळवाणे वाटेल व पाहणाऱ्यांना जाम अवघडल्यासारखे होईल .
पाल तेथे मारताही येणार नाही किंवा झाडूने हुसकावूनही लावता येणार नाही कारण तेथे महाराज आहेत .
पाल येऊ न देणे हाच त्यावर योग्य पर्याय आहे.
शहराच्या स्वच्छतेला,इभ्रतीला, एकजुटीला आणि परंपरेला शोभेल असाच हा उत्सव पार पडेल .
वाद्ये,प्रकाश ,घोषणा ,जयजयकार यांनी तो भारलेला असेल ,
तो शिवरायांच्या विरतेचा सन्मान आहे .
जय शिवराय.जय जिजाऊ ....
