प्रस्थापित व्यवस्थेने मागासवर्गीयांच्या अनेक योजना रखडतच ठेवल्या -राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांचाआरोप

Kolhapur news
By -


     कोल्हापूर न्यूज नेटवर्क

तासगाव:- मागासवर्गीय समाजाची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या शासकीय योजना आहेत त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्यामुळे त्या तशाच रखडत राहिल्या परिणामी मूलभूत गरजांसाठी समाजातील महिलांना लहान मुलासह 21 व्या शतकात ही  आमरण उपोषणासारखे आंदोलन करावे लागते ही लाजिरवाणी बाब असल्याची खंत पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी बोलून दाखवली ते तासगाव येथील तहसीलदार कार्यालयासमोरील वायफळे तालुका तासगाव येथील गट नंबर 1037 मधील वाढीव गावठाण संदर्भातील मूलभूत गरजा नसल्याच्या संदर्भात पुरोगामी संघर्ष परिषदेच्या  ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सौ पुनम फाळके यांचे नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या वतीने सुरू असलेले आमरण उपोषण तहसीलदार यांनी मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले. यावेळी प्रा. सुभाष वायदंडे यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण थांबवण्यात आले त्यावेळी प्रा. सुभाष वायदंडे बोलत होते.
सदर आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन तहसीलदार कार्यालयातून लेखी आश्वासन देऊन कामाची पूर्णता पूर्तता केली जाईल असे सांगण्यात आले.
यावेळी तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, राज्य कार्यकारणी सल्लागार कमिटीचे सदस्य प्रकाश फाळके, वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष प्रा. बाळासाहेब चोपडे, राज्य उपाध्यक्षा सौ.सुनिता खटावकर, युवकचे राज्य सरचिटणीस चंद्रकांत लोंढे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष जगन्नाथ सुवासे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मुसा भाई मुल्ला, तालुकाध्यक्ष भारत मोरे, नयना लोंढे, वनिता सोनवले ,लखन वायदंडे अक्षय खुडे, स्वप्निल बनसोडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    पुरोगामी संघर्ष परिषदेचे तासगाव तहसील कार्यालयासमोरील आमरण उपोषण तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले त्यावेळी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे पो.नि.संजीव झाडे व इतर