पुरोगामी संघर्ष परिषदेचे मुरगुड येथे अण्णाभाऊंना अभिवादन

Kolhapur news
By -


मुरगूड:- (जि.कोल्हापूर)-  विश्व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त मुरगुड येथे प्रतिमेस पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रकाश वायदंडे म्हणाले की,अण्णाभाऊंचं साहित्य हे समाजातील अन्यायग्रस्त घटकाला न्याय देणारं होतं.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा छाया साळुंखे यांचे भाषण झाले. सदर कार्यक्रम पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या वतीने आयोजित केला होता.
सदर कार्यक्रमास मनीषा साळुंखे, उज्वला सोनुर्ले, जयश्री चौगुले, छाया भुये ,सरिता मंडलिक, संगीता मेहतर ,नंदिनी साळुंखे, संगीता साळुंखे, मंगल चौगुले, चंद्रकांत साळुंखे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
शेवटी आभार निशांत साळवी यांनी मानले.