कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जरांगे पाटलांच्या फॅक्टरकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, असे आम्ही महाविकास आघाडीला सांगितले होते. मात्र त्यांनी लक्ष दिले नाही. वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत. आम्ही नवीन आघाडी तयार करत आहोत .या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामुळे ते आता महाविकास आघाडीसोबत नसणार हे स्पष्ट झाले आहे. यामुळे मविआला धक्का बसला आहे.

