शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अव्वलस्थानी असणाऱ्या कागलचा सार्थ अभिमान - शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे

Kolhapur news
By -

                


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून  शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यस्तरावर ओळख असणारा  कागल तालुका ही माझी पहिली कर्मभूमी आहे. गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रामाणिक परिश्रम करणाऱ्या कागल मधील शिक्षकांबद्दल खूप आत्मीयता असून कागलबद्दल खूप अभिमान आहे असे प्रतिपादन  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी केले. 

   खडकेवाडा केंद्र शाळेत सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या . 

  सेवानिवृत्ती निमित्त शंकर पाटील , दादासो कुंभार , कृष्णा बागडी ,लक्ष्मण सुतार , सौ रंजना कुंभार ,सुशीला ढोकरे यांचा सत्कार  शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . 

           याप्रसंगी बाळनाथ डवरी,  शंकर चौगुले ,नामदेव चौगुले, आनंदराव साळोखे, ज्योती जिरगे , शीला जाधव , शबाना मुजावर यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्याबद्दल मनोगत व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना दादासाहेब कुंभार, शंकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

   कार्यक्रमास  प्रभारी गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, शिक्षण विस्तार अधिकारी आर एस गावडे व  शामराव देसाई , केंद्रप्रमुख  संजय चिखलीकर, खडकेवाडा केंद्रातील  सर्व मुख्याध्यापक अध्यापक व अध्यापिका उपस्थित होत्या. 

    कार्यक्रमाचे संयोजन  केंद्रप्रमुख संजय चिखलीकर यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती जिरगे यांनी केले. आभार सुरेश खोत यांनी मानले.