मुरगूड मध्ये येणार सुपरस्टार अभिनेते गोविंदा.

Kolhapur news
By -

 


               

            कोल्हापूर न्यूज नेटवर्क

     

 सुपरस्टार अभिनेते  आणि एके काळचे   सांसद गोविंदा हे दोन मे रोजी सकाळी मुरगूड मध्ये दाखल होणार आहेत.

   कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी ते येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख राजेखान जमादार यांनी दिली.

     हुतात्मा तुकाराम चौकात सकाळी नऊ वाजता पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत गोविंदा यांच्या सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे समजते.

    मुरगूड मधील राष्ट्रवादी,शिवसेना व भाजपाचे सर्व नेते व पदाधिकारी सभेला उपस्थित रहातील असे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

     जिल्हा भाजपा पार्टीचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील,माजी नगराध्यक्ष व बिद्री चे संचालक प्रवीणसिंह पाटील  याशिवाय इतरही  माजी नगराध्यक्ष व नगर सेवक व कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत .

    पत्रक काढून मतदारांना मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

    शहरभर सिने अभिनेते गोविंदा यांच्या आगमनाची उत्सुकता विशेषतः युवावर्गात दिसून येत आहे.