मुंबई :लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होत आहे, 2014 आणि 2019 मध्ये 70 ते 72 टक्के मतदान झाले होते. मात्र आता 50 ते 60 टक्क्यांवर मतदान आले आहे. या कमी झालेल्या मतदानाचा फटका भारतीय जनता पक्षाला बसणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भारतीय जनता पक्ष 400 पार नव्हे तर अडीचशे पर्यंत जागा जिंकेल, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ते मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. प्रचारादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केला आहे.

