जागतिक स्पर्धेत टिकणारे विद्यार्थी घडविणार - संजय घोडावत

Kolhapur news
By -

 

           


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क

शैक्षणिक प्रगतीसह दैनंदिन जीवनाशी संबंधित कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत करून देण्यावर आमचा भर राहणार असून झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आणि जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम विद्यार्थी   घडवू,असा विश्वास संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत यांनी व्यक्त केला. 


सुशीला दानचंद घोडावत चॅरीटेबल ट्रस्टतर्फे मुळशी मधील रावडे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुल या शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन चेअरमन संजय घोडावत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापक सस्मिता मोहंती, विश्वस्त विनायक भोसले, माहिती-तंत्रज्ञान विभाग प्रमुख लकी सुराणा, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल रावडे, मुळशीचे मुख्याध्यापक मायकल पिअरसन, उपमुख्याध्यापक दुश्यंत अभिजीत आणि अर्चनापाटील, विश्वस्त फरहान अझर, मार्गदर्शक दर्पण वासुदेव आदी उपस्थित होते.


  यावेळी बोलताना संजय घोडावत म्हणाले की, येथील निवासी शाळेत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण चमू समर्पित असून तुमचे पाल्य आता आमची जबाबदारी या भावनेने इथे त्यांची जडणघडण केली जाईल. शैक्षणिक पाया मजबूत करण्याबरोबरच विविध खेळांच्या माध्यमातून त्यांच्यातील समुह भावना विकसीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. व्यक्तीमत्व अधिक खुलण्यासाठी जगतमान्य असलेले सोशीन सारखे तंत्रज्ञान वापरले जाईल. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी त्यामागे असलेल्या कष्टांची जाणीव विद्यार्थ्यांना वेळोवेळी करून देऊन कष्टाशिवाय यश नाही, हे मुलभूत महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवले जाईल.