मुरगूड विद्यालयाची युगंधरा अनुसे केंद्रात प्रथम ; विद्यालयाचा निकाल ९८.६० टक्के

Kolhapur news
By -

 




                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 दहावीच्या परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगूड मधील युगंधरा विलास अनुसे हिने सेमी माध्यमामध्ये ९६.२० टक्के मार्क मिळवून मुरगूड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला.याच शाळेची पहिले बारा विद्यार्थी केंद्रात आले आहेत.विक्रमी निकाल लागल्याने पालक वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

     

     नेहा तानाजी गुरव ने ९६ टक्के मार्क मिळवून तर जानवी तानाजी भारमल हिने ९५.६० टक्के मार्क मिळवून केंद्रात दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. मुरगुड विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८.२६ टक्के इतका विक्रमी लागला आहे.९० टक्केच्या वर तब्बल ३१ विद्यार्थी असून ८० ते ८९ % च्या दरम्यान ६४ विद्यार्थी आहेत.केंद्रात पहिले बारा आलेले विद्यार्थी आर्यन पांडुरंग लोकरे ९५.२०टक्के. साई संदीप वाडकर ९५.२० टक्के, स्वयंम विजयकुमार जाधव ९५.२०टक्के, सुमेध सुधीर सावर्डेकर ९४.८० पियुशा अशोक गुरव ९४.८०, हर्षद तुलसीदास कुंभार ९४.८०, सुमित सुधीर सावर्डेकर ९४.६० आदर्श मुकुंद भोगले ९४.४०, श्रद्धा रामचंद्र पाटील ९४.४० 

  

      संस्था सचिव जयकुमार देसाई,अध्यक्षा शिवानीताई देसाई,उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत,चेअरमन डॉ. मंजिरी देसाई मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, कोजीमाशीचे ज्येष्ठ संचालक बाळ डेळेकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील मुख्याध्यापक एस. पी. पाटील,उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी पाटील,उपप्राचार्य एम.डी.खाटांगळे, पर्यवेक्षक एस.डी.साठे यांचे प्रोत्साहन तर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.