आमदार स्वर्गीय पी. एन. पाटील यांना सर्वपक्षीय शोकसभेत आदरांजली

Kolhapur news
By -

 

              


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      काँग्रेसचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय पी. एन. पाटील साहेब यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेस  त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 

  या शोकसभेस श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब, खासदार श्रीनिवास पाटील जी, आमदार सतेज पाटील , आमदार विनय कोरे , आमदार प्रकाश आवाडे , आमदार जयश्री जाधव , आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर , माजी आमदार के. पी. पाटील, संजयबाबा घाटगे, राजीव आवळे, संजीवनीदेवी गायकवाड, शिवसेनेचे विजय देवणे, संजय पवार, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार गट) बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, आपचे संदीप देसाई, भाजपचे महेश जाधव यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.