कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड बस स्थानकावर एस टी चा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्थानकावर रांगोळी रेखाटण्यात आली होती.प्रवासी व नागरिक यांचे स्वागत करण्यात आले.बस गाड्यांची ये- जा व्यवस्थित हाताळण्यात येत होती.
थोडक्यात स्थानकाला छोट्या समारंभ स्थळाचे स्वरूप आले होते.
निवृत्त स्थानक प्रमुख पांडुरंग लोकरे यांना निरोप देण्यात आला व नूतन स्थानक प्रमुख शशीकांत लिमकर यांचे स्वागत करण्यात आले.
राजू जठार यांनी एस टी च्या ७६ वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतला .
या वेळी शिवराज हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक महादेव कानकेकर ,माजी उप मुख्याध्यापक रविंद्र शिंदे,दिगंबर परिट, बंडा भारमल,सुभाष अनावकर,अंजली ढेरे,प्रशांत चौगले,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.वाहतूक नियंत्रक दिलीप घाटगे यांनी आभार मानले.

