कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नानीबाई चिखली येथील माजी सैनिक अंबाजी कांबळे यांची कन्या सौ.मनीषा प्रदीप कांबळे यांच्याकडून पंचशीलनगर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर शाळेतील ४० विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शाळेसाठी दाेन फॅन देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला.
यावेळी सरपंच अल्लाबक्ष सय्यद , शालेय समिती अध्यक्षा सौ.अमृता कांबळे , आरपीआय कागल तालुका संघटक सचिन कांबळे ,सुरेश कांबळे ,अंबाजी कांबळे , विशाल चिखलीकर ,शाळेच्या मुख्याध्यापक सौ. औंधकर मॅडम , सौ.शीतल कांबळे मॅडम, सरिता कांबळे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा बचाव समिती च्यावतीने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.