कोल्हापूर न्यूज नेटवर्क
भाजप नेते नारायण राणे यांनी रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भ्रष्ट मार्गाचा वापर करत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांची संसद सदस्य म्हणून झालेली निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी यासंबंधी निवडणूक आयोगाला नोटीसही बजावली आहे.
विनायक राऊत यांनी वकील असीम सरोदे, किशोर वरक, श्रीया आवले यांच्या मार्फत ही नोटीस बजावली आहे. त्यात नारायण राणे यांच्यावर भ्रष्ट मार्गाने निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप केला आहे. नारायण राणे यांच्यावर 5 वर्षांची निवडणूक बंदी लादण्यात यावी. तसेच मतदान करण्यापासूनही त्यांना वंचित केले जावे, असे राऊत यांनी आपल्या नोटीसीत म्हटले आहे.