शरद पवार आषाढीच्या पायी वारीत सहभागी होणार

Kolhapur news
By -

 


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क

    

      पंढरपुरपर्यंत पायी जाणाऱ्या पालखी वारीचा सर्वांना अनुभव यावा यासाठी 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून राबविला जात आहे. यंदाचे या उपक्रमाचे अकरावे वर्ष आहे. संत तुकोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यात  ७ जुलै रोजी  शरद पवार सहकाऱ्यांच्या समवेत बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत. 


शरद पवार यांच्यासोबत या वारीमध्ये काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे, अभिव्यक्ती चॅनलचे रविंद्र पोखरकर हे देखील या वारीत सहभागी होणार आहेत.