कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाच्या निवडणुकीत आपण तीन पक्षाशी लढत नव्हतो, तर 4 पक्षांविरुद्ध लढत होतो. तो चौथा पक्ष म्हणजे खोटा नरेटीव्ह (समज)होय. आपण, केवळ तीन पक्षांविरुद्ध लढत होतो, पण हा चौथा पक्ष जो होता त्याच्याशी आम्ही लढलोच नाही. संविधान बदलणार हा नेरेटीव्ह इतक्या खालपर्यंत गेला की, आपण परिणामकारकरित्या त्यास काऊंटर केलं नाही. म्हणून पहिल्या 3 टप्प्यात आपणास केवळ 4 जागा मिळाल्या आहेत. पहिल्या तीन टप्प्यातील निवडणुकीत 24 जागांपैकी केवळ 4 जागा आपल्याला जिंकता आल्या आहेत. कारण, विरोधकांनी चुकीचा व खोटा नेरेटीव्ह तयार केला होता. आपल्या सगळ्या जागा ह्या दुसऱ्या टप्प्यातील 24 जागांमध्ये आल्या आहेत. कारण, मग आपण परिणामकाररित्या काऊंटर केलं. दलित व आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात हा नेरेटीव्ह तयार करण्यात आला. मात्र, ही निवडणूक एका निवडणुकीपुरतीच असते, असे म्हणत नेरेटीव्हविरुद्धच्या लढाईत आपण कमी पडल्याचं फडणवीसांनी सांगितलं.
लोकसभा निकालानंतर राज्यात भाजपचा झालेला पराभव हा चर्चेचा विषय राहिला. शनिवारी मुंबईत भाजपच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे पॉलिटिकल गणित मांडत भाजपच कसा मोठा पक्ष लोकसभेत विजयी झाला, याचे गणित मांडले.