कोल्हापूर न्यूज नेटवर्क
A will will find a way.
अशी इंग्रजीत एक म्हण आहे.
इच्छा असेल तर मार्ग दिसेल.
असा सरळ सोपा अर्थ.इच्छा असून ही जर कोणाचा पाठिंबा नसेल तर भिंतीवर डोके आपटणारी तरुणाई पण आपण पहातो.
वीनितने मात्र स्वतः शी ठरवले की कोणाचा पाठिंबा मिळो न मिळो ,एकदा तरी स्वतः च्या हिमतीवर परदेशी शिष्यवृत्ती मिळवायचीच.
आय आय टी न्यू दिल्ली येथून एम टेक चे शिक्षण घेतांना पॉवर इलेक्ट्रॉनिक ,मशिन्स अँड ड्राईव्हज या विषयावर त्याने एक रिसर्च पेपर दिला.
इंग्लंड येथील नॉटींगहॅम या शहरात होणाऱ्या जागतिक रिसर्च कॉन्फरन्स मध्ये त्याच्या पेपरला मान्यता मिळाली आणि त्याच्या अथक परिश्रमाचे सोने झाले.
विवेक हा मुरगूड इथील एका कर्तबगार कुटुंबात वाढला आहे.वडील विवेक कवळेकर हे आदित्य अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत (चितोडगड राजस्थान) येथे जनरल मॅनेजर आहेत.आई सौ.विशाखा या इलेक्ट्रोनिक डिप्लोमा झालेल्या आहेत.आजोबा स्व.वसंतराव कवळेकर गटशिक्षणाधिकारी होते. आजी स्व.वसुंधरा कवळेकर या मुरगूड च्या माजी उपनगराध्यक्षा होत्या.
विनित ला आई वडिलांचे आणि त्याच्या मातृ संस्थेचे प्रोत्साहन मिळाले.मात्र स्वतःच्या अथक परिश्रम व प्रयत्न यातून त्याने हे यश मिळविले आहे.
यापुढे त्याला या क्षेत्रातील अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील.
शिवराज हायस्कूल चे माजी प्राचार्य व हॉलिबॉल पटू महादेव कानकेकर यांचा विनित हा जवळचा नातेवाईक होय.
विनितच्या जागतिक स्पर्धेतील यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.