मुरगूड एस टी स्टँड समोरचे झाड बनले धोकादायक

Kolhapur news
By -

 



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      मुरगूड एस टी स्टँड आवारातील अगदी रहदारी असलेल्या ठिकाणचे एक विशाल काय झाड कोसळण्याच्या    मार्गावर आहे .

   एस टी बस स्थानकाच्या   स्थापने पासूनचे हे झाड आहे.त्याचे आयुष्य ७० ते ८० वर्षे असावे .

   एस टी.बसेस बाहेर पडतात त्या ठिकाणी हे झाड असून त्या खाली गोधडे दूध शॉपी ,फास्ट फूड ,इत्यादी दुकानेही आहेत.

  झाडाच्या फांद्या मोठ्या असल्याने त्या कोसळल्या तर दुकानांसह जीवित हानी सुध्दा होण्याचा धोका आहे.

    नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे , तरीही नगर परिषदेने  त्वरित योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे.

   आज शाहू जयंती असल्याने  या परिसरात गर्दी ही असण्याची शक्यता आहे.